नुकसानीचे पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश
कारंजा लाड प्रतिनिधि पराग कु-हे
कारंजाः सलगतीन ते चार दिवस पडलेल्या सततधार पावसामुळे धनज बुद्रुक मंडळातील शेतपिकांचे मोठे नुकसानझाले. यापार्श्वभूमीवर आ. सईताई प्रकाशदादा डहाके यांनी २१ ऑगस्ट रोजी विविध गावांना भेटी देऊन तेथील नुकसानीची पाहणी केली.
सततधार पावसामुळे कारंजा तालुक्यातील धनज बुद्रुक महसूल मंडळामधील रामटेक, शिरसोली, आंबोडा, पिंपळगाव बु., लाडेगाव, बेलखेड, कामठा, कुऱ्हाड या गावातील शेतकऱ्यांच्या शेतातल्या खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे संबंधित शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहे. नुकसानग्रस्त शेताची पाहणी करून शासनाकडून आर्थिकमदत मिळावी अशी मागणी या गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली गेली. दरम्यान, या अनुषंगाने कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाच्या आमदार सईताई डहाके यांनी उपरोक्त गावांना भेटी देऊन तेथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली
तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी तहसीलदार कुणाल झाल्टे प्रामुख्याने उपस्थित होते. आमदार डहाके यांनी त्यांना महसूल प्रशासनामार्फत नुकसानीचा शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला मिळावा यासाठी तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. राजीव काळे, तालुका कृषी अधिकारी अश्विनी भोसले व इतर उपस्थित होते
Social Plugin