कारंजा लाड प्रतिनिधि पराग कु-हे
कारंजा लाड स्व. प्रकाश दादा डहाके यांच्या जयंती निमित्त कारंजा शहरासह परिसरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांना नागरिक, दादाप्रेमी व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे जनसागर उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले.दादांचे कार्य कायम स्मरणात स्पष्टवक्ता व ठाम भूमिकेतून विचार मांडणारे स्व. प्रकाशदादांनी कारंजा-मानोरा परिसरातील नागरिकां साठी अनेक विकासकामे हाती घेतली. उपजिल्हा रुग्णालयाची उभारणी महसूल व पोलीस उपविभागीय कार्यालयांची स्थापना ऋषी तलाव संवर्धन व विकास ऑक्सिजन पार्कव वन पर्यटन केंद्र निर्मिती ही कामे आजही त्यांच्या कार्याची साक्ष देत असून परिसरात पर्यावरणीय संतुलन राखण्यास हातभार लावत आहेत.
जयंती उपक्रमांची रेलचेलवन पर्यटन केंद्र येथे वृक्षारोपण करण्यात आले. गुणवंत जयंतीनिमित्त सकाळी पूजन झाल्यानंतर ऋषी तलाव व निसर्ग विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. समारंभास अध्यक्ष स्थानावर मुख्याधिकारी महेश वाघमोडे, आमदार सईताई डहाके उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांमध्ये माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, शिक्षणाधिकारी माने साहेब, कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव निलेश भाकरे, संचालक नितीन नेमाने, प्रकाश लिंगाटे, डॉ. पारे, बाबु
पाटील चौधरी, विरेद्र चारथळ, भाजपाचे राजीव काळे, संजय लाहे, निरंजन करडे, विलास राठोड आदींचा समावेश होता. विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन खराटे सर, संतोष चौधरी व प्रवीण कानकीरड सर यांनी केले. तसेच श्री गजानन महाराज मतिमंद निवासी विद्यालय व वृद्धाश्रम येथे अन्नसेवा उपक्रम राबविण्यात आली. नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग कार्यक्रमाच्या निमित्ताने कारंजा व मानोरा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्व. प्रकाश दादांना आदरांजली अर्पण केली. समाज पयोगी व स्मरणीय कार्याबद्दल जनतेने व्यक्त केलेली कृतज्ञता हीच प्रकाश दादांना खरी आदरांजली ठरली
Social Plugin