Ticker

6/recent/ticker-posts

उमरखेड शिवसेना जनसंपर्क कार्यालयात उत्साहपूर्ण प्रवेश सोहळा संपन्न

 



बाळासाहेब पवार दिनांक 

उमरखेड (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्यनेते मा. एकनाथ शिंदे साहेब तसेच यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मा. संजय राठोड साहेब यांच्या लोकाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून, उमरखेड शहरातील गुलाबसिंग रुडे (बंजारा तांडा) परिसरातील अनेक युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

उपशहर प्रमुख संजयभाऊ रुडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या प्रवेश सोहळ्यात ज्ञानेश्वर चव्हाण, जयदीप रुडे, दारासिंग रूडे, सतिश चव्हाण, शुभम चव्हाण, राजु चव्हाण, संतोष रुडे, कपिल रुडे, पवन रूडे, स्वप्नील रुडे, आकाश ताजवे, प्रेम रुडे, चंदन ताजवे, अमरजित रुडे, दिनेश रुडे, किरण चव्हाण, काळे, प्रसाद चव्हाण, प्रविण चव्हाण, सावन रुडे, सतिश रुडे, चंदन काळे, आकाश रुडे आणि इतर अनेक युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.

या प्रवेश सोहळ्याला शहर प्रमुख ॲड. संजिवकुमार जाधव, माजी उपजिल्हाप्रमुख कैलासभाऊ कदम, महिला शहर प्रमुख सौ. सपनाताई चौधरी, शहर संघटिका सौ. संगिताताई धाबे, शहर संघटक अमोल सूर्यवशी, अनुसूचित जातीचे शहर प्रमुख ॲड. अजय पाईकराव, उपशहर प्रमुख बसवेश्वर क्षीरसागर, दामोदर इंगोले, सुनील शहाणे, विनायक पोहरकर, भिमराव सोनुले, कार्यालय प्रमुख राजु गायकवाड, युवासेनेचे सचिन दवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रवेशामुळे शहरातील शिवसेना अधिक बळकट होणार असून, नव्याने पक्षात दाखल झालेल्या युवकांनी पक्षाच्या धोरणांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा निर्धार व्यक्त केला.