अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
०१ऑगस्ट२०२५ घनसावंगी तहसील कार्यालयात आज महसूल सप्ताह कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि सन्मानपूर्वक पार पडला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा उपविभागीय अधिकारी अंबड श्री उमाकांत पारधी होते,तर मार्गदर्शन तहसीलदार घनसावंगी मा सौ मोनाली सोनवणे यांनी केले.
या कार्यक्रमात महसूली वर्षात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.विशेषत्वाने आंतरवली टेभी मंडळाचे मंडळ अधिकारी श्री परमेश्वर ज्ञानोबा शिंदे यांना मंडळ अधिकारी संवर्गातून उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना हा सन्मान मा उपविभागीय अधिकारी श्री. पारधी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमात तहसील कार्यालयाचे सर्व अधिकारी-कर्मचारी,शेतकरी बांधव,पत्रकार बंधू,राजकीय नेते व विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा उपक्रम महसूल विभागाच्या कार्यक्षमतेचे प्रतीक ठरला असून,सन्मानित कर्मचाऱ्यांनी यापुढेही लोकसेवेची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी,असे आवाहन या वेळी करण्यात आले.
Social Plugin