Ticker

6/recent/ticker-posts

आर. सी.सी. पी. एल. सिमेंट कंपनी मुकुटबन (पिंप्रडवाडी) खदानीच्या गैरकायदेशीर सोडलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्याचे उभे पीक पाण्यामध्ये



प्रतिनिधी :- सागर इंगोले 

मुकुटबन पिंप्रडवाडी परिसरात आर. सी. सी. पी. एल. सिमेंट कंपनीची खदान गेल्या पाच ते सहा वर्षांपासून ही कंपनी या मुकुटबन पिंप्रडवाडी परिसरात सुरु झालेली आहे. या खादाणीतून बेकायदेशीर रित्या या खदाणीच्या खोलीकरणात साचलेले अतिरिक्त पाणी सोडण्यासाठी मोठी नाली खोदकाम करून कंपनीने खादानच्या भोवतील भागातून काडून ते पाणी पिंप्रडवाडी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेताकडे वाळविले आहे.   या परिसरातील  शेतकऱ्यांच्या शेताकडे वळविलेले पाणी येथील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांमध्ये शेतांत शिरत आहे. या शेतात शिरत असलेल्या पाण्यामुळे त्या नाल्या लगतील शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली येत आहे

 त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. व या नाल्यावरील  नुकसानग्रस्त शेतकरी डॉ. विजय ताडुरवार ( शेतकरी) यांनी कंपनीकडे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कंपनीला नुकसानीची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याकरिता वारंवार पत्राव्यावहार करून कळविले आहे.परंतु अद्यापही या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व नाल्यालगतील एकाही शेतकऱ्यांना खोटे आश्वासन देऊन या आर. सी. सी. पी. एल.((खदान )कंपनीने नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई दिलेली नाही.अशी या शेतकरी बांधवांनी या कंपनीच्या मुजोरी धोरणावर  तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे.