Ticker

6/recent/ticker-posts

चांडोळ्यात डाॅ.अण्णाभाऊ साठे जयंती साजरी



ग्रामीण प्रतिनिधी-महमदरफी मदार आदमपूरकर 

मुखेड तालुक्यातील ग्राम चांडोळा येथे साहित्यसम्राट, लोकशाहीर डाॅ.अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती मंगळवार दि.२६ ऑगस्ट रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.सर्वप्रथम सर्वच उपस्थित मान्यवरांकडून अर्धाकृती स्मारक,महापुरूषांच्या प्रतिमेस पुष्पहार,पुष्पांजली व श्रीफळ वाढवून सामुहिक अभिवादन करण्यात आले.तद्नंतर क्रांतीचे प्रतीक लाल ध्वजाचे ध्वजारोहण करीत वंदन करण्यात आले.विविध मान्यवरांकडून यथोचित भाषणेसादर करण्यात आली.

सदरील कार्यक्रमास प्रबोधनकाररोडगे ताई,इरफान सौदागर,सरपंच प्रतिनिधी साहेबराव भालके,उपसरपंच गणेश अप्पा मठपती,शिवलीग नाईक,राम पाटील, गुंडेराव गायकवाड,माजी सरपंच शिवलिंग नाईक,साहेबराव वाघमारे,व्यंकटराव पाटील,सुभाष देवकत्ते,संतोष गंगलवाड,साईनाथ भालके,जयंती मंडळ अध्यक्ष बोयनर,उपाध्यक्ष रामा इंगळे,सचिव संदीप तोटरे,बँक सहाय्यक महमदरफी मदार, मुखेड पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे,जमादार तेलंग,ग्राम आजी माजी पदाधिकारी,प्रतिष्ठित नागरिक,महिला, पञकार,राजकीय,शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.सायंकाळी डाॅ.अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचिञाची भव्य मिरवणूक काढण्यात येऊन जयंतीचा समारोप करण्यात आला.