Ticker

6/recent/ticker-posts

देवरी फाटा येथे पारधी समाजाचा गणेशोत्सव उत्साहात


आलेवाडी, प्रतिनिधी: निळकंठ वसू

तालुक्यातील देवरी फाटा परिसरात अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या फासे पारधी समाजाने सामाजिक परिवर्तनाची दिशा स्वीकारत प्रगतीचा मार्ग अवलंबला आहे. पूर्वी जंगलात शिकार करून आपला उदरनिर्वाह करणारा हा समाज आता काळाबरोबर चालत, व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभा राहत आहे. सध्या अनेकजण डेकोरेशन, फुलव्यवसाय यामध्ये स्वतःचे अस्तित्व निर्माण करत आहेत.

मागील वर्षी प्रथमच गणेशोत्सव साजरा करून त्यांनी सामाजिक ऐक्य आणि संस्कृतीशी जोडलेली परंपरा सुरू केली. या वर्षीही गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली असून संपूर्ण वस्तीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

गणेशोत्सव साजरा करताना कायदेशीर बाबींची पूर्तता करत त्यांनी पोलीस परवानगीही घेतली आहे. या बाबत मार्गदर्शन प्रतिनिधी निळकंठ वसू यांनी केले. श्री. खानदान पवार, रसलाल घोसले, पुरुषोत्तम पवार, हरिसिंग घोसले, भालू घोसले यांनी याबाबतची माहिती दिली.

या उपक्रमामुळे पारधी वस्तीमध्ये नवीन उर्जा संचारली असून समाजातील सकारात्मक बदलाचे हे एक उत्तम उदाहरण ठरते.