Ticker

6/recent/ticker-posts

शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना जीवघेणे प्रवास करावा लागतो याकडे शासन व प्रशासनाचा दुर्लक्ष



लाखांदूर तालुका प्रतिनिधी मच्छिंद्र मावळे

आज दिनांक १२/०८/२५ ला.सरांनी बुद्रुक येथील भीषण परिस्थिती मौजा सरांडी बुद्रुक येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून जाणारा रोड सरांडी बुद्रुक हेटी खेळाडूची भीषण परिस्थिती आहे खरं पाहता छत्रपती शिवाजी चौक इथून जाणारा रोड जो आहे मागील 70 वर्षापासून 12 ते 13 कुटुंब हे वास्तव्य करीत आहेत सत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या रोडची भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे ह्या वर्षी भंडारा जिल्ह्यात व लाखांदूर तालुक्यात दोनदा पूर परिस्थिती निर्माण झाली नदी नाल्यांचा विचार केला जाते परंतु गावालगत असलेल्या भेटीवरून गावात येत्या वेळी छाती छाती पाण्यामधून प्रवास करावा लागत असतो कुटुंबातील लोक शाळकरी मुलांना खांदावर मांडून आपल्या मुलांना शाळेत आणून द्यावं लागतोय अशा परिस्थितीमध्ये ह्या रोड कडे ना जिल्हा परिषद सदस्य ना पंचायत समिती सदस्य व स्थानिक ग्रामपंचायत सरपंच सदस्य बॉडी  व आमदार खासदार याकडे लक्ष देणार काय असे सरांडी बुद्रुक येथील जनतेचे लक्ष लागले आहे

या प्रकरणाकडे शासन प्रशासनाने लक्ष न दिल्यास उद्धव ठाकरे गटाचे लाखांदूर तालुका प्रमुख विनोद ढोरे यांनी जाहीर आंदोलनाचा इशारा दिला आहे