बुध दि .[ प्रकाश राजेघाटगे ]
खटाव तालुक्यातील खटाव गावचे सुपुत्र चंद्रकांत गुलाब इंगळे हे २००१ साली फौज मध्ये भरती झाले होते. त्यांनी एमएजी सेंटर बेंगलोर येथे ट्रेनिंग घेऊन इंजिनीअर रेजिमेंट मधून झाशी, जम्मू काश्मिर, राजस्थान, नशिराबाद, बंगाल येथील लिमाकॉम, अलाहाबाद, डेहराडून, पंजाब, लुधियाना, टुकोर आंबाला, दिल्ली व मेरठ या ठिकाणी २४ वर्ष भारत मातेची प्रदीर्घ सेवा केली. सेवा बजावून परतल्या नंतर सेवानिवृत्तीच्या निमित्ताने माजी सैनिक चंद्रकांत इंगळे यांचा आजी माजी सैनिक संघटना, इंगळे परिवार व ग्रामस्थ यांच्यावतीने गावातून मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत करून सत्कार करण्यात आला. यावेळी खटाव तालुका आजी-माजी सैनिक संघटनेच्या व जय हिंद फाऊडेशनच्यावतीने श्री. इंगळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेशदादा शिंदे यांच्या भगिनी डॉ अरुणाताई बर्गे, माजी जि प सदस्य अशोकराव कुदळे, खटाव-माण कारखान्याचे संचालक राहूल पाटील, माजी प स सदस्य मधुकर पाटोळे, बाजार समितीचे संचालक दिपक विधाते, माजी सरपंच अमर देशमुख, जयहिंद फाऊंडेशनचे सातारा जिल्हाध्यक्ष जयदिप भोसले, महिला जिल्हाध्यक्षा उर्मिला कदम, पूनम सांळुंखे, खटाव तालुकाध्यक्षा हेमलता फडतरे, सुनिल पाटील, अध्यक्ष पोपट भराडे, कॅप्टन बबन धुमाळ आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी वीर शहीद जवानांच्या वीरमाता, वीरपत्नी यांचा सन्मान करण्यात आला. खास महिलांच्याकरिता आर के प्रस्तुत होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा हा मनोरंजन पर विनोदी कार्यक्रम राहूल कोळी अंबवडे यांनी सादर केला. उपस्थित मान्यवरांचे स्वागत चेअरमन श्रीरंग इंगळे, कांचन इंगळे, पुष्पा इंगळे यांनी केले. प्रास्ताविक नम्रता भोसले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मोहन गुरव व रघुनाथ घाडगे यांनी केले तर माजी सैनिक अरुण इंगळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास नंदकुमार वायदंडे, राजेंद्र भोसले, श्रीकांत मोरे, सचिन जगताप, गणेश हजारे, दादा इंगळे, रूपाली जगताप, सिंधु इंगळे, तेजश्री इंगळे, सचिन घाडगे, शंकर शिंदे, अशोक इंगळे, छगन इंगळे आदिंसह आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, इंगळे परिवारतील सर्व सदस्य, ग्रामस्थ, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
Social Plugin