मन्सूर शहा:----धोत्रा .भंनगोजी गावात आज दिनांक २२ ऑगस्ट रोजी पोळा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांनी आपल्या बैलांची सजावट व रंग रगोटी, पूजा आणि मिरवणुकीने गावात उत्सवमय वातावरण निर्माण झाले होते.
पहाटेपासूनच शेतकरी आपापल्या बैलांना अंघोळ घालून, रंगीबेरंगी हार, घंटा, मोरपिसांची टोपी, वाळ्याच्या माळा आणि झगमगाटी सजावटीत सजवू लागले. बैलांना पुरणपोळी, गूळ, हरभरा यांसारख्या नैवेद्याने पुरवले गेले. बैलांची पूजा करून शेतकऱ्यांनी त्यांच्या श्रमांचे कृतज्ञतेने स्मरण केले. दुपारी गावातील मुख्य रस्त्यावर बैलांची मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, लहान मुलांनी पारंपरिक वेशात सहभागी होत संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि आनंदमय केले. महिलांनी रांगोळ्या काढून, आरती करून सणाची शोभा वाढवली.
गावच्या प्रतिष्ठित मंडळींनीही उपस्थित राहून सणात सहभाग घेतला. सरपंच , उपसरपंच, सदस्य, पोलीस, पाटिल, तंटा मुक्ती.अध्यक्ष, सदस्य, ग्राम, सोसायटी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य,पत्रकार, तसेच, गावांतील प्रतिष्ठित,नागरिक, यांनी सहभाग, घेत.पोळा हा शेतकऱ्याच्या जीवनात बैलांचे महत्त्व अधोरेखित करणारा सण असल्याने गावात वर्षानुवर्षे हा सण श्रद्धेने साजरा केला जात आहे. गावातील शांतता, व हिंदु, मुस्लीम, एकत्र.येऊन एकोपा दर्शवणारा हा सण यंदाही उत्साहात पार पडल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे . तसेच धोत्रा. भंनगोजी. गावात. पोळा, असो की इतर सन, सर्व. नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित राहून. साजरी करण्यात येथे. हे विशेष..





Social Plugin