अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
अंबड येथील श्रीमती चंद्रप्रभा स्वरूपचंद कासलीवाल जैन इंग्लिश शाळेच्या १४ वर्षाखालील योगा स्पर्धेत वैभवी मुरलीधर जाधव १७ वर्षाखालील योगा स्पर्धेत धनंजय अनिल भालेराव व वैष्णव मुरलीधर जाधव यानी विजय मिळवला.तर १९ वर्षाखालील योग स्पर्धेत हर्षद दत्ता वाघमारे विजयी ठरला.मुले व मुलींच्या योगासंघाने अंबड येथे झालेल्या पावसाळी शालेय क्रीडा स्पर्धेत योगाच्या अंतिम सामन्यात विजय मिळवून जिल्हास्तरीय योगा स्पर्धेसाठी निवड निश्चित केली आहे.
या विजयी संघाचे शाळेचे अध्यक्ष डॉ.प्रवीणकुमार कासलीवाल डॉ.रमेशचंद्र गंगवाल,शिरीष सावजी,प्रवीण बाकलीवाल,संजय चांदीवाल,सुरेश दिडपोळे,डॉ.राजेंद्र काला,डॉ.नरेश अग्रवाल,डॉ.संतोष मोहळे,चंद्रप्रभू दिडपोळे,संजय इंचूरे,मुकेश सावजी,संतोष बाकलीवाल,दिपक पाटणी,भूषण काला,डॉ.अनिल पांडे,दिलीप बुर्ले तसेच शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर भारद्वाज,क्रीडा शिक्षक नागेश वराडे,हरिश्चंद्र जरांगे,सौ आराधना मुंगीकर यांच्यासह सर्व शिक्षक,पालक यांनी विजय संघाचे अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Social Plugin