सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचा ४२ वा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न
बुध दि [प्रकाश राजेघाटगे ]
भाषेवर प्रभुत्व आहे त्यांचे जीवन सुखर होते,चांगले गुण असणाऱ्या कर्तृत्ववानांचा नेहमीच सन्मान केला जातो असे प्रतिपादन राज्याचे शिक्षण संचालक डॉ.महेश पालकर यांनी केले .
राष्ट्रभाषा भवन येथे आयोजित सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाच्या ४२ व्या वार्षिक पुरस्कार वितरण व राष्ट्रभाषानुरागी शिक्षक-शिक्षकेतर सहकारी पतसंस्थेचे सेनानिवृत्त सभासद व गुणवंत पाल्यांचा गौरव अशा संयुक्त सत्कार व पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी डॉ.महेश पालकर बोलत होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा.श्रीधर साळुंखे माजी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र लाहोटी,सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष ता.का .
सूर्यवंशी,कार्यवाह अनंत यादव पतसंस्था चेअरमन विजयकुमार पिसाळ,व्हा.चेअरमन नवनाथ कदम,सेक्रेटरी सागर पाटील भवन सचिव श्रीकांत लावंड,परीक्षा मंत्री शि. रा. खामकर, उपाध्यक्ष इकबाल मुल्ला यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती .
डाॅ.पालकर पुढे म्हणाले,मंडळाच्या वतीने गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा आणि सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार केला जात आहे ही कौतुकाची बाब आहे. ज्ञानदान करताना शिक्षकांना इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असले तरी आपल्या व्यवसाया- वर त्यांची निष्ठा असली पाहिजे. आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात भाषेचे स्थान अन्यनसाधारण असल्याने भाषेचा विकास महत्त्वाचा ठरतो.लेखन, वाचन,भाषण आणि संभाषणाद्वारे विद्यार्थी घडत असतात.श्रवणाद्वारे मुल शिकते.भाषेवरील प्रभुत्वामुळे ज्ञानसमृद्धी वाढून जीवन सुखकर होते म्हणून भाषेच्या विकासासाठी आपण झोकून देऊन कार्य केले पाहिजे. हिंदी अध्यापक मंडळ या दिशेने महाराष्ट्र राज्यासाठी आदर्शवत काम करीत आहे .
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. हिंदी अध्यापक मंडळाच्या गीतमंचाचे प्रमुख अनिलकुमार कदम व त्यांच्या सहकार्यांनी सुरेल आवाजात ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले.मंडळाच्या व पतसंस्थेच्या पदाधिकार्यांनी मान्यवरांचे शाल, श्रीफल,स्नेहवस्त्र,ग्रंथ सम्मानचिह्न देऊन स्वागत केले.
मंडळाचे अध्यक्ष ता.का. सूर्यवंशी यानी आपल्या प्रास्ताविकामध्ये हिंदी अध्यापक मंडळ, पतसंस्था व अन्य सहयोगी संस्थांच्या कार्याचा संक्षिप्तआढावा घेवून दिल्या जाणार्या विविध पुरस्कारांची माहिती दिली.
प्रमुख वक्ते श्रीधर साळुंखे म्हणाले,कोणत्या व्यक्तीच्या हस्ते आपला सत्कार झाला आहे याचे भान आपण ठेवले पाहिजे.सत्कार सेवानिवृत्तीनंतरचा किंवा सेवा कालातला असला तरी तो स्वल्पविराम आहे पूर्णविराम नाही याची खूणगाठ मनी बाळगली पाहिजे.शिक्षकांच्या एक-एक पैशातून निर्माण झालेल्या निधीतून दिला गेलेला पुरस्कार विद्यार्थ्यांनी नेहमी लक्षात ठेवला पाहिजे.भविष्यात कुठल्याही कारणांसाठी गैर गोष्ट माझ्याकडून होणार नाही याची दक्षता पुरस्कारप्राप्त शिक्षक व विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे अशी अपेक्षा साळुंखे यानी व्यक्त केली.
यावेळी महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे नूतन अध्यक्ष ता.का. सूर्यवंशी,सचिव ह.रा.सूर्यवंशी, कोषाध्यक्ष शाहनवाज मुजावर,परीक्षा मंत्री सुधाकर माने यांचा सपत्निक सन्मान करण्यात आला. जिला मंडळाचे कार्याध्यक्ष नेताजी ननावरे, सहकार्यवाह दिपाली सोनावणे.परीक्षा समिति अध्यक्ष सुनंदा शिवदास, वाचनालय अध्यक्ष मारुती शिवदास, सातारा तालुकाध्यक्ष संतोष शिर्के यांचा सपत्निक/पतिसहित सत्कार करणेत आला.त्याचप्रमाणे अजय सूर्यवंशी यांची यू .पी .एस .सी परीक्षेद्वारे भारतीय सेनेमध्ये प्रथम वर्ग अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.पतसंस्थेच्या वतीने उत्तम योगदान दिलेल्या संचालक व २७ सेवानिवृत्त सभासद पाचवी,आठवी शिष्यवृत्तीप्राप्त मा. शालांत व उच्च मा. शालांत परीक्षेतील सभासदांच्या गुणवंत२५ पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करणेत आला. राष्ट्रभाषा प्रचार प्रसार पुरस्काराने जिल्ह्यातील २४ माध्य.
शाळांना तसेच विविध परीक्षांमधील ८७ यशस्वी विद्यार्थी अशा एकूण १७५ पुरस्कारांचे वितरण कार्यक्रमात करणेत आले .
याप्रसंगी सत्कारमुर्ती राजेंद्र घोरपडे,अजय सूर्यवंशी यानी आपले मनोगत व्यक्त केले.व्हा. चेअरमन नवनाथ कदम यानी आभार प्रकट केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिनाक्षी बडीगार व उज्वला मोरे यांनी केले .
कार्यक्रम यशस्वी करणेसाठी राजु सय्यद,विश्वनाथ नलवडे,कुमार सोनवलकर,शरद चव्हाण, व्यवस्थापक नवनाथ शिंदे व त्यांचे सर्व सहकारी यानी विशेष परिश्रम घेतले.
Social Plugin