बुध दि [ प्रकाश राजेघाटगे ]
पोलीस पाटील संघटनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी ललगुण येथील सौ.साधना चव्हाण यांची निवड करण्यात आली.
*सातारा येथे महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील एकीकरण संघाच्या वतीने नूतन जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली.सौ.चव्हाण यांनी कर्तव्यदक्ष पोलीस पाटील म्हणून आदर्शवत कार्य केले आहे त्यांनी महिला आघाडीच्या माध्यमातून पोलीस पाटील संघटनेसाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. या कार्याची दखल म्हणून त्यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.यावेळी पोलीस पाटील संघटनेचे राज्याध्यक्ष प्रविण राक्षे , महासचिव दिपक गिरीगोसावी, जिल्हाध्यक्ष सुहास भोसले , उपाध्यक्ष विकास जाधव ,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ.प्रिया देशमुख समन्वयक अक्षय भोसले व जिल्हा पोलीस पाटील एकीकरण संघाचे पदाधिकारी तसेच सदस्य उपस्थित होते.
Social Plugin