Ticker

6/recent/ticker-posts

देशाच्या सिमेवरील जवांनासाठी बुधच्या विद्यार्थ्यांनी पाठवल्या राख्या



बुध   दि [प्रकाश राजेघाटगे ]

 श्री नागनाथ विद्यामंदिर बुध च्या विद्यार्थी यांनी टाकाऊ पदार्थांपासून राख्या तयार केल्या . विद्यालयाचे प्राचार्य अंकुश भांगरे यांच्या संकल्पनेतुन दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षीही विद्यार्थी व विद्यार्थिनीनी फळाच्या बिया, रंगीत फुलांच्या , कागदी वस्तूचा वापर करून सुंदर राख्या तयार केल्या . या विद्यार्थी यांना महिला शिक्षिका पल्लवी कुंभार, सविता भांगरे , अंजली कचरे, स्वारा माने , सानिका बुधावले, चंदा वाईकर तसेच वर्गशिक्षक संजय माने, तानाजी पाटील , नितीन नारागुडे , नामदेव धनावडे, नवनाथ काळे, संताजी देसाई, नाना दडस, भगवान सरवदे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले . सर्व राख्या एकत्रित करून त्यामधून प्रथम तीन क्रमांक काढले त्यास रोख पारितोषीक नाना दडस यांनी प्राचार्य अंकुश भांगरे यांच्या हस्ते देण्यात आले तिन्ही क्रमांक विभागून देण्यात आले . प्रथम - श्वेता मुकूंद जगदाळे, अंजली शशिकांत बागेकरी द्वितीय जिया मुनिर आतार , ऐश्वर्या अशोक बोराटे तृतीय विश्वजीत नाना दडस, आकांक्षा अमोल चव्हाण सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी 9 ब वर्गातील आहेत त्यामुळे वर्गशिक्षक संजय माने यांचे विशेष अभिनंदन केले . 

 राख्या जम्मू काश्मीर व कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या जवानांना टपालाद्वारे विकास कांबळे , महादेव खोमणे व गोविंद बोराटे शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पाठवल्या . या राख्यामुळे देशाच्या सिमेवर असणाऱ्या जवांनाना निश्चितच प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल असे मत प्राचार्य अंकुश भांगरे यांनी मांडले या उपक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी - विद्यार्थिनी यांचे राष्ट्रीय  हरित सेनेच्या वतीने  भगवान सरवदे यांनी धन्यवाद व आभार व्यक्त केले .