हिमायतनगर शहरांमध्ये मुसळधार पाऊस
प्रतिनिधी:- उत्तम पाईकराव
हिमायतनगर सोनारी फाटा ते हादगाव कडे जाणारा मार्गावर जवळगाव या गावी रोडवर असलेल्या पुलावरून खूप मोठे प्रमाणात पाणी वाहत आहे. रस्त्यावर असलेले गाव जवळगाव, कामारी, वाटफळी व हदगाव कडे जाणाऱ्या लोकांचे संपर्क तुटला असून या पाण्याचा प्रवाह एवढा मोठा होता की, या प्रवाहात चार चाकी वाहन प्रत्यक्षात वाहून गेली आहे. तसेच हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावे पाण्याखाली गेली असून गावातील लोकांच्या घराघरात पाणी साचले आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्याचे व पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले
हिमायतनगर शहरामध्ये घरात व शेतात पाणीच पाणी साचले आहे. हिमायतनगर शहर व परिसरात दोन दिवसापासून पावसाची संतधार सुरू आहे .शनिवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने अक्षरशः तांडव माजवला आहे .विजांचा कडकनाथ व वादळी वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शहरातील रस्त्यांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने शेकडो घरांमध्ये पाणी साचले असून गृह उपयोगी साहित्य भिजवून नुकसान झाले आहे. अनेक नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली.
दरम्यान मुसळधार पावसामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गावोगावी नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवानंतर मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाने नागरिकांना मोठ्या संकटात टाकले असून प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्याची मागणी होत आहे. हिमायतनगर शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूने नाल्यांचे बांधकाम केले गेले नसल्याने वार्ड क्रमांक चार नेहरूनगर आणि वार्ड क्रमांक 16 मुर्तीजा नगर परिसरातील वस्तीत खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.महामार्गावर पाणीच पाणी होऊन अनेकांच्या घरात पाणी गेल्याने मोठे नुकसान झाले आहे हा प्रकार लक्षात घेता प्रशासनाकडून लोकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे .





Social Plugin