लाखांदूर प्रतिनिधी :- मच्छिंद्र मावळे
नातेवाइकांच्या घरी मरणाला जात असलेल्या बाप लेकाच्या दुचाकीला डोझरने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर वयोवृद्ध वडील गंभीर आहेत. ही घटना आज सकाळी ९.१५ वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील विरली/बु येथील आंबेडकर चौक परिसरात घडली. शंकर मुखरन बावनकुळे( वय अंदाजे २७ वर्षे) रा. ईटान असे घटनेतील मृतक युवकाचे नाव आहे. तर मुखरान बावनकुळे असे गंभीर जखमी असलेल्या वडिलांचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, घटनेतील वडील आणि मुलगा नातेवाईकांकडे मयत झाल्याने ईटान इथून भेंडाळा येथे मायतीसाठी जाण्यास निघाले. दरम्यान, वाटेत लाखांदूर तालुक्यातील विरली/बू येथे आंबेडकर चौक परीसरात मेनरोडवर हीघटना झाली या माहितीवरून लाखांदूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी आदींनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला आणि तनापूर्न परिस्थिती नियंत्रणात आणली.





Social Plugin