किरण पाटील ग्रामीण प्रतिनिधी
मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्नाड या गावात सहा भाविक पवित्र उमराह यासाठी मक्का मदीना येथे जात आहे, व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुक्ताईनगर येथून जळगाव जिल्हा मुस्लिम मन्यार बिरादारी चे जिल्हा उपाध्यक्ष हकीम आर चौधरी, तालुका उपाध्यक्ष अहेमद ठेकेदार, अमीर चौधरी, अफसर खान, आदि मानवरांच्या हस्ते हज उमराह साठी जाणाऱ्यांचे पुष्पहार घालून सत्कार करण्यात आले, 1) शेख भिकन शेख शामद, 2)शेख शामद शेख वजीर 3)राबियाबी शामद 4) राईसा बी शेख भिकन 5) शेख सबदर शेख अकबर 6} शकीला बी शेख सबदर आदींचे सत्कार करण्यात आले. उमराह म्हणजे छोटा हज म्हणतात इस्लाम मध्ये एक महत्त्वपूर्ण पवित्र यात्रा आहे, जी मक्का येथे केली जाते पैगंबर मोहम्मद हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चीं सुन्नत आहे, या यात्रेमध्ये विशेष, इहराम, खास कपडे परिधान करावे लागता, मक्का मध्ये ,काबा,चे परीक्रम करावे लागता, त्याला (तवाफ )करणे असे म्हणतात, तलिबया पढना, इहराम परिधान केल्या नंतर यासाठी विशेष प्रार्थना वाचन करणे लब ब्याक अल्लाह हुम्म्मा लबायेक, व तवाफ परिक्रमा करणे,काबा या पवित्र ठिकाणी सात वेळा परिक्रमा करणे. सई, सफा आणि मरवा या दोघं मध्ये सात वेळा धावणे होय. केस कापणे, शेविंग करणे अशा प्रकारच्या या पवित्र यात्रेसाठी या पाच धार्मिक विधी केले जात आहे, म्हणून इस्लाम धर्मा मध्य,उमराह,ला छोटा हज करणे असे म्हटले जाते. उमरा ला जाण्यासाठी या छोट्या खाणी कार्यक्रम मध्ये याप्रसंगी मुस्लिम मन्यारबिरादरी चे जिल्हा उपाध्यक्ष हकीम चौधरी, अहेमद ठेकेदार, हाफिज याकूब मौलाना, शेख इसा शेख वजीर, शेख आसिफ शेख इसा, आदी मान्यवर उपस्थित होते..
Social Plugin