Ticker

6/recent/ticker-posts

दोन जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी...



भरधाव बोलेरो पिकअपने दोन दुचाकीस दिली धडक !

पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि 

कारंजा लाड दारव्हा रस्त्यावरील पावर हाऊस जवल दि.३ ऑगस्ट रोजी सकाळी ९:०० वाजताच्या सुमारास अनियंत्रित भरधाव बोलेरो पिकअपने दोन दुचाकींना धडक दिल्याने या घटनेत दोन दुचाकीस्वार ठार तर दोन गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली आहे.

या अपघातामध्ये सुभाष किसन चव्हाण वय ५५ वर्ष राहणार शिक्षक कॉलनी कारंजा व नाना जयसिंगपूरे वय ५६ वर्ष रा. खरडगाव ता.नेर जि. यवतमाळ ह. मु. यशवंत कॉलनी कारंजा यांचा जागीच मृत्यू झाला असून, जया नाना जयसिंगपूरे वय ५० वर्ष ह.मु. यशवंत कॉलनी कारंजा व प्रभू माणिक राठोड वय ४८ वर्ष रा. कामठवाडा ता. कारंजा अशी गंभीरजखमीची नावे आहेत. यातील नानाजयसिंगपूरे हे एमएच ३७ डी ६८१७क्रमांकाच्या दुचाकीने पत्नी जया यांच्यासोवत तेरवीच्या कार्यक्रमासाठी लोही ता. नेर येथे जात होते. तर सुभाष चव्हाण हे एमएच ३७ एबी ५२१२ क्रमांकाच्या दुचाकीने शेतातील काम आटोपून प्रभू राठोड यांच्या समवेत कारंजाच्या दिशेने येत होते. यादरम्यान दारव्हाकडून येणाऱ्या भरधाव वेगात बोलेरो पिकअप क्र. एम.एच.२९ बी ७६८ ने दोन्ही दुचाकींना जोरदार धडक दिली. दरम्यान रस्त्यावरील प्रवाशांकडून घटनेची माहिती मिळताच रुग्णसेवकरमेश देशमुख, शंकर रामटेके व विनोद खोड यांनी स्वतःच्या ताब्यातील रुग्णाहिकेतून अपघातग्रस्तांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले,

येथे डॉक्टरांनी तपासून उपरोक्त दोघांना मृत घोषित केले तर जखमीवर प्रथम उपचार केले. यातील प्रभू राठोड यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे रेफर केले तर जया जयसिंगपुरे यांच्यावर येथील एका खाजगी रुग्णालयात उपयार करण्यात येत आहे. दरम्यान, घटनेनंतर बोलेरोपिकअप वाहनाचा चालक वाहन जागेवर सोडून पळून गेला आहे. घटनेचा पुढील तपास कारंजा शहर पोलीस करीत आहे. या घटनेतील मृतक सुभाष चव्हाण हे रामगाव रामेश्वर ता. दारव्हा येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते. तर त्यांच्या पत्नी विजया ह्या ग्रामसेविका म्हणून कार्यरत आहे. तसेच नाना जयसिंगपूरे हे पशुसंवर्धन विभागाअंतर्गत मुरंबी ता. कारंजा येथे कार्यरत होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून मिळाली पेश आहे

  •  Scanned by Gmail