Ticker

6/recent/ticker-posts

सरस्वती माध्यमिक विद्यालय मुकुटबन येथे वृक्षारोपण



प्रतिनिधी :-सागर इंगोले 

 जय बजरंग शिक्षण संस्था मुकुटबन  द्वारा संचालित सरस्वती माध्यमिक विद्यालय मुकुटबन येथे दिनांक 31/07/2025 रोज गुरुवारला वृक्षारोपण करण्यात आले.  जय बजरंग शिक्षण संस्था मुकुटुबन व पोलीस स्टेशन मुकुटबन यांच्या संयुक्त विद्यमाने सद्भावना एक बाग तयार करून वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला मुकुटबन पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री विलास कुलकर्णी साहेब तसेच सरस्वती माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. ममता जोगी मॅडम, माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक, श्री सुरेश परचाके ,सर प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक, श्री  चंद्रशेखर  वैद्य सर, जूनियर कॉलेजच्या प्राध्यापिका, सौ प्रवीणा काकरवlर मॅडम, व शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर,कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

 शालेय परिसरात एक सुंदर बाग तयार करून प्रत्येक विद्यार्थी यांना एक झाड दत्तक घेऊन त्यांना जोपासना करायची जबाबदारी देण्यात आली अशा प्रकारे सरस्वती विद्यालय येथे वृक्षारोपण करण्यात आले.