डॉ गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
कारंजा, . महाराष्ट्रातील राज्य राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या विविध समस्या सोडवणारी एकमेव संघटना राज्य राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ या संघटनेच्या शाखा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत आहेत. नुकतीच वाशिम जिल्हा शाखेच्या कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्यात आली.
या बैठकीस राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर आणि अमरावती विभागीय अध्यक्ष गजानन गायकवाड होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. विशेषतः, पुरस्कारप्राप्त शिक्षकांना पूर्वीप्रमाणे दोन वेतनवाढी मिळाव्यात यासाठी न्यायालयीन लढा उभारण्याचा विषय मांडण्यात आला. निवड झालेली नवीन कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष अजयकुमार मोटघरे, जिल्हा
सरचिटणीस अर्जुन वरघट, जिल्हा सल्लागार दीपक राऊत, जिल्हा कार्याध्यक्ष आनंद सुतार, जिल्हा कोषाध्यक्ष संभाजी, जिल्हा उपाध्यक्ष विलास गांजरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मोहन शिरसाट, जिल्हा मुख्य संघटक पंढरीनाथ चोपडे, जिल्हा संपर्कप्रमुख मुरलीधर जाधव, जिल्हा महिला प्रतिनिधी मीनाक्षी नगराळे, राज्य प्रतिनिधी राजू मोरे, अमरावती विभाग अध्यक्ष गजानन गायकवाड, अमरावती अशी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
Social Plugin