आलेवाडी, दि. १८ ऑगस्ट —
नीलकंठेश्वर मंदिर येथे श्रावण महिन्यातील सोमवारी भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली. श्रावण सोमवारी भगवान शंकराच्या दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांची भल्या पहाटेपासूनच मंदिर परिसरात रांग लागली होती.श्रद्धेने ओतप्रोत वातावरणात भाविकांनी बेल, फुलं, दूध, जल अर्पण करत भगवान नीलकंठेश्वराची पूजा अर्चा केली. मंदिर ट्रस्टच्यावतीने दर्शनाची योग्य व्यवस्था करण्यात आली होती, तसेच स्थानिक स्वयंसेवक आणि पोलीस प्रशासन देखील गर्दी नियंत्रणासाठी कार्यरत होते.श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी येथे भाविकांची अशीच भक्तिभावाने भरलेली गर्दी पाहायला मिळते. विशेषतः आलेवाडी आणि आजूबाजूच्या गावांतून भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.हे धार्मिक वातावरण पाहता, नीलकंठेश्वर मंदिर परिसर हा श्रावण महिन्यातील श्रद्धेचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू बनला आहे.





Social Plugin