मोकाट जनावरे व श्वानांमुळे नागरिकांना धोका बंदोबस्ताची मागणी
गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
कारंजा शहरात मागील पाच ते सहा महिन्यांपासून मोकाट जनावरे व श्वानांची संख्या प्रचंड वाढली आहे. रस्त्यावर ठाण मांडून बसणारी ही जनावरे वाहनचालकांना त्रास देत असून, गेल्या दोन महिन्यांत नागरिकांवर हल्ल्याच्या घटनाही वाढल्या आहेत. असाच धक्कादायक प्रसंग शनिवार, १६ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता मोठे राममंदीर परिसरात घडला. शाळकरी मुलगा आपल्या आईसोबत शाळेत जात असताना एका गाईने अचानक त्यांच्यावर जीवघेणाअशी वाढत असून, त्यांच्या चाव्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहेत. शासकीय रुग्णालय कारंजा येथे मिळालेल्या माहितीनुसार, मागील दोन महिन्यांत तब्बल ४१० नागरिक श्वानांच्या चाव्यामुळे उपचारासाठी दाखल झाले आहेत. यामुळे पालक व शाळकरी मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नगरपालिकाप्रशासनाने काही दिवसांपूर्वीच लाऊडस्पीकर द्वारे जनावरांच्या मालकांना सूचना दिल्या होत्या की, त्यांनी आपली जनावरे मोकाट सोडू नयेत, अन्यथा कारवाई करण्यात येईल.हल्ला केला. सुदैवाने महिला व मुलगा बालबाल बचावले. या घटनेनंतर शहरात चर्चा रंगली की दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण?जनावरांचा मालक की प्रशासन ?दरम्यान, मोकाट श्वानांचा त्रासही मात्र, प्रत्यक्षात त्याचा काहीही परिणाम दिसून आलेला नाही. नागरिकांचे म्हणणे आहे की, अशा घटना थांबल्या नाहीत तर एखाद्या निर्दोष व्यक्तीचा बळी जाऊ शकतो. त्यामुळे तातडीने मोकाट जनावरे व श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी शहरभरातून होत आहे..





Social Plugin