Ticker

6/recent/ticker-posts

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी..

 



टेंभुर्णी प्रतिनिधी विष्णु मगर 

आज राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल टेंभुर्णी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली .कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोक मान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे पत्रकार रावसाहेब अंभोरे तसेच अंबादास पांढरकावळे, रुस्तुम जोशी , जिजाऊ वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य पंजाब लहाने, जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन वायाळ यांची उपस्थिती होती.त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक संजय फलटणकर यांनी केले. कार्यक्रमाविषयी बोलताना रावसाहेब अंभोरे म्हणाले की, शाळेमध्ये अशा महान पुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करणे म्हणजे महापुरुषांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देणे.

यामध्ये शाळेतील रेड हाऊस मधील आदित्य म्हस्के ,रोहित राऊत ,जनार्दन म्हस्के ,सत्यम भोरे ,सोहम पैठणे, ग्रीन हाऊस  मधील विघ्नेश म्हस्के, रोहन पैठणे ,गौरव म्हस्के, शितल सोनसाळे ,ब्लू हाऊस मधील आयुष उगले ,प्रगती वरगने, सृष्टी चेके, समीक्षा हिवाळे, येलो हाऊस  मधील पार्थ कराळे, आदित्य राऊत या विद्यार्थ्यांनी भाषणातून मनोगत व्यक्त केले. 

त्यानंतर  स्टुडन्ट ऑफ द मंथ यामध्ये हर्षल गाडे ,सार्थक वरगणे ,युग बोराडे ,तनुष उगले, शिवराज पिंपळे, रीनाज पठाण, प्रथमेश नवले, प्रगती सपाटे, आदित्य म्हस्के, वैष्णवी बोराडे, तसेच होमवर्क हिरो शौर्य म्हस्के ,आयुष्य भालेराव, तनुजा गोफणे, तनुजा म्हस्के ,स्वराज फलके ,आदित्य जाधव, आरुष मुनेमाणिक, आराध्या उबरहंडे, पार्थ जाधव, आनंद जाधव  ऑलवेज स्पिक इन इंग्लिश  यामध्ये भूमिका धनवई, आर्या आराख, शिवराज जगदाळे, आयुष उगले, आदर्श अहिरे या विद्यार्थ्यांना बॅज देण्यात आल्या .

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे विद्यार्थी आराध्या उबरहंडे व आभार प्रदर्शन आनंद जाधव यांनी केले. या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गजानन वायाळ ,अमोल तेलंग्रे, विनोद उबरहंडे ,शरद राजभोज, विशाल शिंगणे, आदित्य इंगळे, विनोद धवलिया, समाधान सुरवसे, भागवत लहाने,वनिता सुद्रिक, रोहिणी सोळुंके, स्नेहल रिंढे अश्विनी दूनगहू, सुनिता मोरे, सोनल मापारी, शंकर सवडे, शंकर मोढेकर, विमल मदन यांची उपस्थिती होती.