Ticker

6/recent/ticker-posts

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 वी जयंती संपन्न



पाटस प्रतिनिधी - गणेश गावडे

१० सप्टेंबर रोजी पाटस येथे आद्य क्रांतिवीर उमाजी राजे यांची जयंती झांज पथक, डीजे, हलगी पथक, रथ, संबळ पथक अशा विविध पारंपारिक वाद्यांच्या नादामध्ये व भंडारा याची उधळण करत भव्य दिव्य अशी मिरवणूक काढून साजरी करण्यात आली. वज्रगड येथून सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय जल्लोषात ज्योत आणली व कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन जय मल्हार क्रांती संघटना श्री नागनाथ युवक मंडळ,श्रीमंत शिवतांडव प्रतिष्ठान अशा विविध संघटनांनी केले यात प्रमुख पाहुणे म्हणून राजे उमाजी नाईक आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष व जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे तसेच पाटस गावचे माजी सरपंच योगेंद्र (बाबा) शितोळे , भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन सत्वशील भाऊ शितोळे पाटस गावच्या विद्यमान सरपंच तृप्तीताई भंडलकर, संभाजी ब्रिगेड पुणे शहर अध्यक्ष अविनाश मोहिते व इतर मान्यवर उपस्थित होते. 

आद्य क्रांतिवीर उमाजी राजे यांच्या जयंतीनिमित्त दौलत (नाना) शितोळे, योगेंद्र शितोळे, डॉ. मधुकर आव्हाड,अविनाश मोहिते, विजय चव्हाण, बाळासाहेब तोंडे पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक व रामोशी समाजाच्या इतिहासावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला तसेच संत निरंकारी मिशन पाटस यांच्याकडून नियोजन सहकार्य केल्यामुळे सर्व निरंकारी मिशन सदस्यांची दौलत नाना शितोळे यांच्याकडून स्वागत करण्यात आले. शिवव्याख्याते गणेश महाराज परताळे इतिहास विचारवंत शंभूराजे समाधी क्षेत्र वढ बुद्रुक यांचे व्याख्यान झाले व मा श्री रणजीत पाटील हॉटेल लोकराज्य 3453 चे सर्वेसर्वा यांनी भोजन सौजन्य दिले तरी त्यांचेही समाजाकडून आभार मानण्यात आले.