अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
बहुजन विचारांचा जागर करणारे पत्रकार व दैनिक समर्थ राजयोग चे जिल्हा प्रतिनिधी फारुक शेख यांचा नुकताच शिवबा संघटना व लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्यावतीने सन्मान करण्यात आला.इंदेवाडी भुलेश्वर नगर येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात त्यांना शाल व श्रीफळ देऊन गौरवण्यात आले.
हा सन्मान संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.यावेळी गणपत कांबळे. महाराष्ट्र उपाध्यक्ष,विष्णू घनगाव.जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ शेडगे,मुजाहिद सौदागर,ओंकार शेडगे आणि जनार्दन मस्के यांनी संयुक्तपणे फारुक शेख यांना पुढील पत्रकारितेच्या वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.फारुक शेख हे गेल्या काही काळापासून बहुजन समाजाच्या हक्क, अधिकार आणि सामाजिक प्रश्नांवर सातत्याने लेखन करत असून,त्यांनी सत्यपर,निर्भीड आणि बांधिलकीची पत्रकारिता केली आहे.त्यांच्या कामाची दखल घेत संघटनेच्या वतीने हा सन्मान करण्यात आला असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सन्मान स्वीकारल्यानंतर फारुक शेख यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की हा सन्मान माझ्यासाठी मोठी प्रेरणा असून समाजहितासाठी आणि वंचितांच्या आवाजासाठी लेखणी चालू ठेवण्याची जबाबदारी यामुळे अधिक वाढली आहे.शिवबा संघटना आणि लहुजी साळवे बहुजन क्रांती सेना यांच्यावतीने समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम राबवण्यात येतो.या माध्यमातून समाजमन जागृत ठेवणाऱ्या कार्यकर्ते, पत्रकार,शिक्षक यांचा सन्मान करण्यात येतो.
हा कार्यक्रम इंदेवाडी भुलेश्वर नगर येथे साधेपणाने पार पडला.उपस्थित मान्यवरांनी पत्रकार फारुक शेख यांच्या कार्याला शुभेच्छा देत,पुढील काळातही सामाजिक न्याय आणि समतेच्या विचारासाठी कार्य करत राहावे,अशी अपेक्षा व्यक्त केली.





Social Plugin