घोटी खुर्द प्रतिनिधी, गणेश रोंगटे,
इगतपुरी तालुक्यातील भरवीर खु. गावात बिबट्याने थैमान घातले आहे. ८ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास शेतकरी बाळू काशिनाथ बांडे व समाधान काशिनाथ बांडे यांच्या गोठ्यात बिबट्याने हल्ला चढवला. बिबट्याने अवघ्या काही मिनिटांत दोन्ही भावंडांच्या दावणीला बांधलेल्या तब्बल ३५ शेळ्यांना ठार केले. हल्ल्याच्या वेळी शेळ्या धडपडू लागल्याने गावकऱ्यांनी आरडाओरडा केला तोपर्यंत बिबट्याने तेथून पळ काढला. गेल्या काही आठवड्यात परिसरातील गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढला आहे.
पाळीव जनावरांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा, तसेच बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी झालेल्या पशुधनाची शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल भाऊ निसरड यांनी केली.





Social Plugin