अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
गेल्या नऊ दिवसांपासून जालना येथे धनगर समाजाचे नेते दिपक बोऱ्हाडे मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. शासनाने अद्याप त्यांच्या मागण्यांची दखल घेतली नसल्याने धनगर समाजात तीव्र असंतोष पसरला आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने समाजबांधव जालना येथे येत आहेत.आज जालना-अंबड मार्गावरील शेवगा पाटी येथे धनगर पिंपरी गावातील नागरिकांनी अनोख्या पद्धतीने उपोषणकर्त्यांप्रती आपला पाठिंबा व्यक्त केला.उपोषणासाठी जाणाऱ्या धनगर समाजबांधवांना केळी आणि बिसलरी पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.
या कृतीतून धनगर समाजाने आपली एकता आणि या आंदोलनाप्रती असलेली निष्ठा दाखवून दिली आहे. यावेळी अनेक समाजबांधवांनी बोलताना,"जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करत नाही,तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील.आम्ही दिपक बोऱ्हाडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत,असे सांगितले. शासनाने तातडीने या उपोषणाची दखल घेऊन धनगर समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात,अशी मागणीही यावेळी करण्यात आली.या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून,लवकरच यावर तोडगा काढला जाईल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





Social Plugin