Ticker

6/recent/ticker-posts

सहकार विद्या मंदिर दे. माही शाळेत नवरात्र उत्सहानिम्मित दांडिया नृत्य



प्रतिनिधी @समाधान भुतेकर 

दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा नवरात्र उत्सहाची परंपरा कायम ठेवत सहकार विद्या मंदिर येथे दांडिया नृत्याचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमाची सुरवात प्राचार्य सचिन खरात सर, रोहित सर खेडेकर सर याच्या हस्ते माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली

 त्यानंतर सार्वजनिक आरती घेऊन दांडिया नृत्यला सुरवात करण्यात आली यामध्ये शाळेतील सर्व मुलींनी विविध दांडिया नृत्य सादर करीत कार्यक्रमाची शोभा वाढवाली सर्व मुलांनी टाळ्याच्या कडकडीत दादा देत नृत्यचा मनमुराद आनंद घेतला सदर कार्यक्रमासाठी सर्व महिला शिक्षिकांनी विशेष मेहनत घेत कार्यक्रम नियोजन पूर्वक पर पाडला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव तळेकर सर यांनी केले