Ticker

6/recent/ticker-posts

हिंदी भाषा भारताच्या सांस्कृतिक एकतेचे प्रतीक आहे ....प्रा.डाॅ.सादिक तांबोळी



  बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेचा  दैनंदिन संवादात  व लिखाणात वापर केला पाहिजे. कारण हिंदी ही भाषा भारताच्या सांस्कृतिक प्रतीकाची भाषा आहे असे प्रतिपादन डॉ.तांबोळी यांनी केले. कला व वाणिज्य महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या हिंदी दिन कार्यक्रमांमध्ये  प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते . व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर .पी. भोसले, प्रा.डॉ.संजय क्षीरसागर  प्रा . मुल्ला मॅडम तसेच प्रा. मुल्ला सर इत्यादी उपस्थित होते.पुढे आपल्या भाषणात डॉ. तांबोळी म्हणाले,"हिंदी भाषा ही भारताच्या स्वातंत्र पूर्व काळात एकमेकाची संपर्क भाषा म्हणून ओळखली जात होती. 

आजही वेगवेगळ्या राज्यांमध्ये संपर्काची भाषा म्हणून ओळख आहे. त्यामुळे विविध संस्कृतीचे दर्शन आपणाला घडते तसेच भारतात हिंदी भाषेमुळे रोजगाराच्या संधी या प्रकाशन व पत्रकारिता व्यवसाय मध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत याविषयीची विस्तृत माहिती सांगितली. अध्यक्ष भाषणांमधून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आर.पी. भोसले म्हणाले,"हिंदी ही भारतात सर्वात जास्त बोलणारी भाषा आहे आणि म्हणूनच आपण इतर भाषा बरोबर हिंदी भाषेचाही आदर केला पाहिजे हिंदी भाषा एकमेकांना जोडणारी भाषा आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक मुल्ला मॅडम यांनी केला. तर सूत्रसंचालन प्रा. मुल्ला यांनी केले तर आभार प्रा. महेश आवळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर सेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.