बुध दि . [ प्रकाश राजेघाटगे ]
सार्वजनिक बांधकाम विभागाचे खटाव तालुका उपअभियंता संजय खोत यांना सार्वजनिक बांधकाम मंडळ सातारा यांच्या वतीने उत्कृष्ट उपअभियंता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
अभियंता दिनाचे औचित्य साधून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामकाजाबद्दल अभियंता गुणगौरव सोहळ्यात उपअभियंता संजय खोत यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते त्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, राहुल अहिरे सर्व उपअभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, मक्तेदार कर्मचारी उपस्थित होते.
खोत हे खटाव तालुक्यातील बुध गावचे सुपुत्र आहेत. त्यांना आदर्श अभियंता पुरस्कार मिळाल्याबद्दल खटाव तालुक्यातील ग्रामस्थ, बुध ग्रामस्थ , राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले आहे.





Social Plugin