अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव येथील गल्हाटी नदीला आलेल्या अचानक आलेल्या पुरामुळे गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे.या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज श्री.सतिष घाडगे यांनी गावाला भेट दिली.त्यांनी पूरग्रस्त कुटुंबांची भेट घेऊन त्यांना धीर दिला आणि तातडीने मदत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.
पुराचे पाणी अचानक घरात शिरल्याने अनेक कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे.घरातील जीवनावश्यक वस्तू, कपडे आणि अन्नधान्य पूर्णपणे भिजून खराब झाले आहेत. यामुळे कुटुंबांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
या गंभीर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर श्री.सतिष घाडगे यांनी तात्काळ मदतीसाठी पावले उचलली.त्यांनी अंबडचे तहसीलदार श्री.विजय चव्हाण यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली आणि पूरग्रस्त कुटुंबांचे तातडीने पंचनामे करून त्यांना शासनाकडून लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देण्याचे निर्देश दिले.
गावकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांची तात्पुरती सोय व्हावी याकरिता घाटगे यांच्या माध्यमातून पूरग्रस्त कुटुंबांना किराणा किट वाटप करण्यात येणार आहे.या किटमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असेल, जेणेकरून अन्न आणि पाण्याची समस्या तात्पुरती दूर होईल.या घटनेमुळे गावातील जनजीवन विस्कळीत झाले असून,प्रशासन आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.





Social Plugin