अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
अंबड जिल्ह्याचे आराध्य दैवत श्री मत्स्योदरी देवीच्या नवरात्र महोत्सवास सोमवार (ता.22) पासून प्रारंभ झाला असून संस्थानच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.दरम्यान नुतन अंबड उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सिद्धेश्वर धुमाळ यांनी देवी मंदिरास भेट देवून मंदिर परिसराची बारकाइने पाहणी करून विविध बाबींचा आढावा घेतला.
श्री मत्स्योदरी देवीची नवरात्र काळात मोठी यात्रा भरते,सदर यात्रेदरम्यान लाखो भाविकांची गर्दी होत असल्याने पार्किंग, दुकाने,नारळ,कटलरी,ज्वेलरीच्या दुकाना,दुचाकी,चार चाकी वाहनांची पार्किंग आदी व्यवस्थेची उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.धुमाळ यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधितांना काही महत्वपूर्ण सुचनाही दिल्या.ते नुकतेच आलेले असल्याने या यात्रेच्या अनुभवाची त्यांची ही पहिलीच वेळ आहे.या वेळी संस्थान पुजारी व विश्वस्त गीताविलास खुटेफळकर,संस्थानचे व्यवस्थापक कैलास शिंदे आणि कर्मचारी उपस्थित होते.
*पाकीटमार व टवाळखोरांवर सिसिटीव्ही कॅमेऱ्याप्रमाणे पोलिसांचीही सतत नजर
श्री मत्स्योदरी नवरात्र उत्सव काळात देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना विशेषतःमुली,महिला भविकांना यात्रेमध्ये कुठलाही त्रास होणार नाही या दृष्टीने मंदिर व परिसरात चोख पोलिस बंदोबस्त राहणार असून पाकीटमार व टवाळखोर यांच्यावर सिसिटीव्ही कॅमेऱ्याप्रमाणे पोलिसांचीही सतत नजर असेल.भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस तत्पर असून ही यात्रा दरवर्षी प्रमाणे यावर्षीही सुरळीत व शांततेत संपन्न व्हावी यासाठी यात्रेदरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त राहील.त्यामुळे भाविकांनी निर्धास्तपणे देवी दर्शनाचा तसेच नवरात्र उत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन डॉ.सिध्देश्वर धुमाळ यांनी केले आहे.





Social Plugin