आलेवाडी, दि. 15 सप्टेंबर – मूळचे आलेवाडी येथील व सध्या अकोला जिल्ह्यात छावा संघटनेचे उपजिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत असलेले श्री. निवृत्ती पाटील वानखडे यांना "शिवसंग्राम प्रतिष्ठान, महाराष्ट्र – पुणे" यांच्यातर्फे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
गेल्या दशकाहून अधिक काळापासून वानखडे यांनी अकोला जिल्ह्यात छावा संघटनेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व युवक प्रबोधनाचे कार्य सातत्याने केले आहे. त्यांचे हे कार्य छावा जिल्हाध्यक्ष श्री. शंकरराव वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक प्रभावीपणे पुढे जात आहे.
प्रशस्तिपत्र, स्मृतिचिन्ह व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून, हा सन्मान मिळाल्याबद्दल जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या यशाबद्दल वानखडे यांनी सांगितले की, "हा सन्मान माझ्या कार्याचा गौरव तर आहेच, पण ही जबाबदारी अधिक वाढवणारा आहे. संघटनेच्या माध्यमातून मी कायम समाजहितासाठी कार्यरत राहीन."





Social Plugin