प्रतिनिधी/विश्वराज वाकोडे.
8 सप्टेंबर 2025 /चेनापूर रोजी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन शांतीनिकेतन विद्यालय मालेगाव येथे करण्यात आले होते. वयोगट 14 वर्ष मुले या गटात तालुक्यातील 26 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता,त्यापैकी एकूण पाच विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती.
त्यापैकी तीन विद्यार्थी हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चेनापूर येथील आहेत. अथर्व बापुराव जंगिलवाड(प्रथम),आरिश अफसरखान पठाण (द्वितीय),शशिकांत गोविंद माने (चतुर्थ).आजच्या या बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन माननीय लोकदाजी गोडबोले साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती अर्धापूर यांच्या हस्ते झाले होते याप्रसंगी श्री गुलाबराव मदने क्रीडा संयोजक तालुका अर्धापूर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.





Social Plugin