Ticker

6/recent/ticker-posts

आर सी सी पी एल कंपनी विरोधात आमरण उपोषण



प्रतिनिधी :-सागर इंगोले 

मुकुटबन : येथील आर सी सी पी एल  सिमेंट कंपनी ही आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची ही सिमेंट कंपनी अशी ओळख आहे पण या कंपनीमध्ये कामगार सुरक्षा वर प्रश्न चिन्न उपस्तित होत आहे. साल  जानेवारी 2022  मध्ये येथील अपघात ग्रस्त कामगार सागर विनायक इंगोले यांचा रॉ मिल विभागात काम करत असतांना कंपनी व येथील अधिकाऱ्यांच्या हलगर्जे पणा मुळे या कामगारांचा अपघात झालेला होता त्यानंतर श्रम आयुक्ताकडे प्रकरण दिले गेले तेथे त्यांना डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्यांना काम दया असे कंपनीला श्रम आयुक्ता कडून निर्देश देण्यात आले परंतु  स्टोअर मध्ये काम दिल्या नंतर तेथील अधिकारी त्या कामगारला जड काम म्हणजे सिलेंडर गोडाऊन मध्ये सिलेंडर रॅक ला लावण्यासाठी हेल्पर देत नसल्यामुळे त्याला तू स्वतः सिलेंडर रॅक ला लाव असे सांगत असल्यामुळे व दि. 09. /12/2024 रोजी सिलेंडर ची मोजणी करत असतांना त्या कामगारांच्या छातीच्या भागाला सिलेंडर लागले व आधीच हा अपघातयामुळे कामगार शारीरिक कमजोर असल्यामुळे त्याला मोठी दुखापत होऊन अपंगत्व आले त्यामुळे कंपनीकडे झालेल्या अपघाताची नुकसान भरपाई दयावी याकर्ता अनेकवेळा विनंती करून मागणी  करत होता पण या कामगारला या कंपनीतील अधिकारी वेळ काडत आहे असे दिसून आल्यावर येतील अधिकारी त्या का. कामगारला शेवटी असा अपघात झालेलाच नाही 

यांचे पुरावे सादर करा असा प्रश्न करायला लागले त्यामुळे या कामगारांने आमरण अंनत्याग उपोषण दि 22/09/2025 रोजी कंपनी गेट समोर करण्याचा निर्णय घेतला व त्यांच्या पाठीशी दिव्यांग बांधव,,विधवा महिला,. व शेतकरी भूमिपुत्र, यांनी सुद्धा यांच्या विधवा महिला व दिव्यांगना csr मधून अर्थासाहाय्य देणे, पायाभूत सोई सुविधा पुरविणे  याकर्ता याआधी अनेक निवेदने स्मरण पत्रे देऊन सुद्धा कंपनीतील csr विभागाकडून यांची निवेदनाची दखल न घेतल्यामुळे यांनी सुद्धा होणाऱ्या आमरण उपोषण ला पाठिंबा देण्यात आला व शेतकरी भूमिपुत्रानांया कंपनीने शेती घेत असतांना शेतकरी कुटुंबातील एक व्यक्तीं आम्ही कायमस्वरूपी घेऊ असे आश्वासन देऊन सुद्धा हॆ भूमिपुत्र या कंपनीमध्ये कमी वेतना मध्ये ठेकेदारी पद्धतीत काम करत आहे व कंपनीला napl pay roll वर कायमस्वरूपी कामावर घेण्यासादर्भात अनेक वेळी निवेदने दिली पण अद्यापही या भूमिपुत्रांना कायमस्वरूपी कामावर न घेतल्यामुळे या शेतकरी भूमिपुत्रांनी होणाऱ्या उपोषणाला पाठिंबा दर्शवीला उपोषण वेळी हॆ सर्व प्रकारच्या मागण्या तीन दिवसात मान्य न झाल्यास गेट बंद आंदोलन सुद्धा करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला