Ticker

6/recent/ticker-posts

उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सिद्धेश्वरजी धुमाळ यांचा पत्रकार संरक्षण समितीकडून सत्कार



अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ

अंबड -९ सप्टेंबर पोलीस आणि पत्रकार हे दोन्ही लोकशाहीचे महत्त्वाचे स्तंभ आहेत.या दोन्ही स्तंभांमधील परस्पर सहकार्याचे एक उत्तम उदाहरण नुकतेच अंबडमध्ये दिसून आले. अंबडमध्ये नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी डॉॅ सिद्धेश्वर धुमाळ यांनी पदभार स्वीकारला असून,पत्रकार संरक्षण समितीने त्यांचा आदरपूर्वक सत्कार केला.यामुळे पोलीस आणि पत्रकारांमधील समन्वयाचा नवा अध्याय सुरू झाल्याची चर्चा आहे.

या सत्कार सोहळ्यादरम्यान पोलीस अधिकारी dr डॉ धुमाळ यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की,"कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी पत्रकारांशी संवाद असणे अत्यंत महत्त्वाचे आहे."त्यांच्या या विधानाने दोन्ही बाजूंकडून सौहार्दाची भावना दिसून आली. पत्रकार संरक्षण समितीच्या सदस्यांनी आपली अधिकृत यादी डॉ.धुमाळ यांना सुपूर्द केली.या माध्यमातून त्यांनी पत्रकारांवरील अन्याय दूर करण्यासाठी पोलिसांसोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याची तयारी दर्शवली.या प्रसंगी पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष अशोक गाढे, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर साळुंके,तालुका सचिव गणेश सपकाळ यांच्यासह गजानन पुरी,बळीराम राऊत, आकाश जळके,सुरेश खरात आणि फारुक शेख आदी पत्रकार बांधव उपस्थित होते...