बुध दि . [प्रकाश राजेघाटगे]
हिंदुस्थानचे स्वातंत्र्य,एकता व अखंडता,संपर्काचे माध्यम म्हणून हिंदी ने खूप मोठे योगदान दिले.त्याच हिंदीला महाराष्ट्रात राज्यकर्त्यांकडून विरोध होत आहे ही शोकांतिका असून हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी व मराठीसह सर्वच भारतीय भाषांच्या सन्मानासाठी भविष्यातील लढ्याला सर्वांनी समर्थ साथ द्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष ता.का. सूर्यवंशी यांनी केले.
राष्ट्रभाषा भवन,संभाजीनगर सातारा येथे हिंदी दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला,त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सरदार बाबासाहेब माने महाविद्यालय,रहिमतपूरच्या माजी हिंदी विभाग प्रमुख डॉ. सुनंदा मोहिते, लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, साताराचे प्रा.डॉ.संतोष बंडगर उपस्थित होते. अतिथींच्या शुभहस्ते याप्रसंगी मुंशी प्रेमचंद व महादेवी वर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व हिंदी सप्तसूत्री प्रतिज्ञा सादर करणेत आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरुन बोलताना ता.का. सूर्यवंशी पुढे म्हणाले, एकतेचे उदाहरण म्हणून हिंदी भवन व राष्ट्रभाषानुरागी पतसंस्था या दोन्ही मातृसंस्था एकाच छताखाली असाव्यात यासाठी संस्थेने ९ गुंठे जागा खरेदी केली असून यामध्ये तीन मजली इमारतीसह सुमारे ९०० आसन क्षमतेचे सभागृह उभारण्याचा मनोदय आहे. त्यासाठी सर्वांनी पाठबळ देण्याचे आवाहन त्यानी केले. प्रमुख अतिथी डॉ. सुनंदा मोहिते व डॉ. संतोष बंडगर यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या कार्याबद्दल गौरव उद् गार काढले. या कार्यक्रमास उपाध्यक्ष इकबाल मुल्ला,परीक्षा मंत्री शिवाजीराव खामकर, राज्य सचिव ह.रा.सूर्यवंशी, सुधाकर माने, संजय शिंदे, व्हा.चे.नवनाथ कदम, सुनंदा शिवदास, मीनाक्षी बडीगार, छाया कदम कार्याध्यक्ष ननावरे आदींनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक कोषाध्यक्ष शाहनवाज मुजावर यांनी केले. ईशस्तवन व स्वागत गीत लता कोळी यानी सादर केले.
हिंदी दिनाचे औचित्य साधून सातारा व रत्नागिरी जिल्हातून आमंत्रित करण्यात आलेल्या ७१हिंदी शिक्षक, शिक्षिकेंचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करणेत आला.
सूत्रसंचालन विजयकुमार पिसाळ यांनी केले. तर आभार नेताजी ननावरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी व्यवस्थापक नवनाथ शिंदे व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.





Social Plugin