प्रतिनिधी शिवाजी हत्तीकर
इचलकरंजी येथे दि. 19/09/2025 रोजी अखिल भारतीय होलार समाज संघटनेची कोल्हापूर जिल्हा नूतन कार्यकारणी संपन्न झाली.जिल्हा उपाध्यक्ष सूरज देसाई यांचे सामाजिक कार्य हे नुसते होलार समाजाप्रती नसुन बहुजन समाजातील प्रत्येक तळागातील, गोरगरीब, दिव्यांग, हृदपकाळ, निराधार माता भगिनी व बांधवांसाठी प्रामाणिक पणे असल्याने त्यांच्या कामाची पावतीची दखल घेत अखिल भारतीय होलार समाजाचे संघटनेचे प्रमुख जेष्ठ नेते यांनी त्यांच्या का
र्याची दखल घेऊन त्यांना त्यांच्या आदेशानुसार जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्त केल्याचे घोषित होताच फटाक्यांच्या गजरात शेकडो कार्यकर्तेनीं जोरदार जल्लोष केला होता.होलार समाज बांधव यांच्यासह त्यांच्यावर विविध पक्षाचे तसेच बहुजन समाजातील प्रत्येक घटकांनी पदाधिकारी, सामाजिक संघटना, तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी शुभेच्छाचा वर्षाव केला होता. यावेळी तालुक्यातील व शहरातील होलार समाजातील शेकडो समाज बांधव यांच्यासह बहुजन समाजातील विविध प्रमुख घटक उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष श्री शितल ढवळे तसेच जिल्हा उपाध्यक्ष श्री सूरज देसाई यांची निवड झाल्याने या बैठकीत घोषित करण्यात आले. उपस्थिती मान्यवरांनी त्यांच्या कार्या बद्दल सवांद करुन शुभेच्छा दिल्या. तसेच संघटनेच्या मान्यवरांनी शाल बुक्के, श्रीफळ देत यावेळी नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार केला तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील चाहत्यांनी देखील सत्कारासाठी मोठी गर्दी केली होती शहरातील सर्व होलार समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बहुजन बांधव, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin