प्रतिनिधी कवठे महांकाळ (जाखापूर) शिवाजी हत्तीकर
मौजे जाखापूर येथे दिनांक 19/09/2025 रोजी सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान राबिविणेत आले. स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत आरोग्य विभाग मार्फत गावातील सर्व महिलांची आरोग्य तपासणी करणेत आली तसेच लाभार्थींचे आयुष्यमान कार्ड काढणेत आले. या अभियानाला गावातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी ग्रामपंचायत अधिकारी श्रीम प्रतिभा चव्हाण व सौ. सरपंच सिंधुताई सुतार, उपसरपंच श्री अतुल पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस, जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, आरोग्य अधिकारी CHO शिल्पा शिंदे, आरोग्य विभाग MPW योगेश गावडे, आशा सेविका शितल पाटील , निलम पाटील , बचत गट CRP करुणा पाटील , अंगणवाडी सेविका , ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.





Social Plugin