उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टीके, पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करावा
बुध दि . [प्रकाश राजेघाटगे]
पुसेगाव नगरीत सुंदररित्या नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. विविध मंडळांच्या वतीने कौतुकास्पद धार्मिक कार्यक्रम, विविध देखावे, मैदानी खेळ प्रत्यक्षिते, सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यावर्षीही अशीच परंपरा चालू ठेवा. शासनाच्या धोरणानुसार या नवरात्रौत्सवात कुठल्याही मंडळाने डॉल्बी लावण्याचा प्रयत्नही करू नये. अन्यथा कडक कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा कोरेगाव उपविभागीय अधिकारी अजित टिके यांनी दिला.
गणराया अवॉर्ड पारितोषिक वितरण आणि नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वच गावांतील मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक पुसेगाव येथील श्री सेवागिरी मंगल कार्यालयात आयोजित केली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सपोनि संदीप पोमण, पोलीस कर्मचारी, होमगार्ड, गावातील पोलीस पाटील विविध मंडळांचे अध्यक्ष, व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा
आपल्या परिसरातील आजारी रुग्ण, म्हातारी माणसं, गरोदर महिला, आबालवृद्ध यांच्यासाठी तरी कार्यकर्त्यांनी संयम ठेवणे गरजेचे आहे. नवरात्रौत्सव डॉल्बी मुक्त व पारंपरिक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन करून त्या नऊ दिवसात, आगमन आणि विसर्जन मिरवणुकीतही 'नो डॉल्बी' अन्यथा कडक कारवाई करण्याचा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टीके यांनी यावेळी दिला.दरम्यान पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्या गणेश मंडळानी दहा, अकरा दिवस समाजोपयोगी उत्कृष्ट कार्यक्रम राबवले. त्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान व सत्कार गणराया अॅवॉर्ड देऊन करण्यात आला.
परवाने घेणे बंधनकारक
देवीमुर्ती आगमनावेळी तसेच विसर्जनावेळी पारंपारिक वाद्यांचा वापर करावा, डॉल्बी डीजे, लेझर लाईटचा वापर कुणीही करावयाचा नाही, अन्यथा कारवाई होणारच. नवरात्र मंडळांनी धर्मदाय आयुक्त यांच्याकडे मंडळाची नोंद करून परवाने घेणे बंधनकारक आहे.
- संदीप पोमण, सपोनि. पुसेगाव पोलिस स्टेशन छायाचित्र _ पुसेगाव : पोलीस ठाण्यातर्फे झालेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टीके, सपोनि संदीप पोमण व इतर. छाया - प्रकाश राजेघाटगे बुध
-





Social Plugin