Ticker

6/recent/ticker-posts

घरगुती गणेशमूर्तींचे सात दिवसानंतर गौराईसह मोठ्या उत्साह वातावरणात विसर्जन



पाटण(दिनकर वाईकर) 

 पाटणसह परिसरातील घरगुती गणेश मूर्ती व गौराईचे कोयना नदी पात्रासह ठिकाणी असणाऱ्या तलावामध्ये मोठ्या उत्साहात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले  विसर्जनामध्ये तरुणाईसह अबाल वृद्ध चिमुकल्यास सह महिलांनी  घरगुती गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी कोयना नदी काठ परिसरात मोठी गर्दी केली होती घरगुती गणपती बाप्पाची परिसरात ढोल ताशाच्या गजरात मिरवणुकीत वाजत गाजत विसर्जन  नेण्यात आले मिरवणुकीत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देण्यात येत होत्या सात दिवसाच्या घरगुती गणेश मूर्तींचे व गौराईचे कोयना नदी पात्रात गणेश भक्तांनी जड अंतकरणाने गणेश मूर्तींचे विसर्जन केले यावर्षी गौराईचे उशिरा आगमन झाले

 त्यामुळे सात दिवस गणपती बाप्पाची मनोभावे पूजा आरच्या केल्यानंतर लाडक्या बाप्पाला निरोप देताना भाविक भक्तास सह चिमुकल्यांनाही घही  वरून आल्याचे दिसत होते सात दिवसाच्या गणेशाच्या पाहुणचारानंतर घरगुती गणेश मूर्तींचे भाविक भक्तांनी गौराईच्या विसर्जना बरोबरच आपल्या लाडक्या बाप्पाचा ही मंगळवारी उशिरा निरोप देण्यात आला त्यावेळी आभाळवृद्ध गणपती बाप्पांना निरोप देताना गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला अशा घोषणा चा जय जयकार करत होते त्यावेळी कोयना नदी काढता सारा परिसर घोषणांनी घुमत होता तर सुवासिनींनी महिलांनी देखील लाडक्या गौरीचे उत्साहात विसर्जन केले यावेळी महिला व युवती पारंपारिक वेशभूषेत गौराईच्या गाण्यावर फेर धरत गाणी म्हणत होत्या यामुळे वातावरण आनंदी व उत्साही झाले होते