प्रतिनिधी – निळकंठ वसू पाटील, आलेवाडी
आलेवाडी येथील भाजप कार्यकर्ते व आमदार रणधीर भाऊ यांचे कट्टर समर्थक तसेच ग्रामपंचायतचे माजी सदस्य आणि माजी रोजगार सेवक श्री. अनिल भाऊ भोंगळ यांचा वाढदिवस यंदा पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात आला. या निमित्ताने गावात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला छावा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष निवृत्ती पाटील, शेतकरी संतोष पाटील वानखडे, शंकर पाटील वानखडे विचार मंचचे कार्यकर्ते तसेच गावातील अनेक मान्यवर आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांनी अनिल भोंगळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. वृक्षारोपण करून त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वाचा संदेश दिला.गावात अशा प्रकारे सामाजिक जाणीव ठेवून वाढदिवस साजरा करण्यात आल्याने नागरिकांतून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.





Social Plugin