Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षक दिनानिमित्त स्वयंशासन दिन उत्साहात साजरा



मन्सूर शहा. धोत्रा. भ.


खंडाळा मकरध्वज : जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा, खंडाळा मकरध्वज येथे शिक्षक दिनानिमित्त स्वयंशासन दिन उत्साहात व पारंपरिक वेशभूषेत साजरा करण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक व शिक्षकांच्या भूमिका पार पाडत शालेय जबाबदाऱ्या सांभाळल्या.

या वेळी मुख्याध्यापकाची भूमिका सातवीतील अस्मिता संतोष मलवार हिने निभावली, तर वर्गशिक्षक म्हणून सातवी आदित्य वाकोडे व रिजवान शहा, सहावी बिलकिसबी शहा,  तेजल ठेंग, पाचवी शिरीन शहा व जानवी ठेंग, चौथी वैष्णवी सांगळे, तिसरी ईश्वरी यशवंते, दुसरी धीरज सीताफळे व साई भवरे तसेच पहिली साठी पल्लवी सीताफळे व जिविका साळवे यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या.

विद्यार्थ्यांनी आपल्या अध्यापन शैलीतून शिक्षकांची नक्कल करत सर्व तास यशस्वीरीत्या घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नेतृत्वगुण, आत्मविश्वास, जबाबदारीची जाणीव तसेच शिक्षक व्यवसायाची महत्त्वपूर्ण जाण झाली.या प्रसंगी सर्व विद्यार्थी भूमिकेतील शिक्षक-शिक्षिका पारंपरिक वेशभूषेत उपस्थित होते. शाळेत आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. सर्व शिक्षक भूमिकेतील विद्यार्थ्यांना कॉफीची व्यवस्था रिजवान शहा व अस्मिता मलवार यांच्यातर्फे करण्यात आली होती

*"शिक्षक दिनाची आली नवी चाहूल,*

*विद्यार्थ्यांनी घेतली गुरूंची धावपळ.*

*स्वयंशासनाने फुलले नवे स्वप्न,*

*शाळा झाली ज्ञानाचे सुवासिक उपवन."*

हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य जागवणारा ठरला असून शाळा परिसरात उत्साह व अभिमानाचे वातावरण पसरले