Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा झोपडपट्टी सेल च्या संयोजक पदी अंजनिकर साहेबराव यांची निवड

 


बिलोली प्रतिनिधी ~ आमेटवार राजेश

सगरोळी सर्कल मधील सामाजिक कार्यकर्ते तसेच हिप्परगा थडी येथील माजी सरपंच प्रतिनिधी साहेबराव अंजनीकर यांची भारतीय जनता पार्टी नांदेडच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री डॉ. संतुकराव हंबर्डे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली

भाजपा झोपडपट्टी सेलच्या जिल्हा संयोजक पदावर अंजनीकर यांची पुनश्च एकदा निवड करण्यात आली. अंजनीकर हे तळागाळातील माणसाशी मिळाऊ स्वभावाने परिचित आहेत. त्यांनी सगरोळी सर्कल मधून पंचायत समिती निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केले होते.या निवडीमुळे बिलोली तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. त्यांनी मागील काळातील केलेल्या कामगिरीची दखल घेऊन पक्षाने त्यांना ही जबाबदारी त्यांच्या खांद्यावर पुन्हा दिले. त्यांच्या या निवडीमुळे हिप्परगा थडी येथील नागरिकांकडून अभिनंदन होत आहे. या निवडीचे पत्र भाजपाचे जिल्हा अध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे साहेब यांच्या स्वाक्षरीने प्राप्त झाले. असून त्यांच्या कार्याची दखल भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी घेतले आहे. म्हणून त्यांना जिल्ह्य स्तरावर काम करण्याची संधी देण्यात आली.त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. अंजनीकर साहेबराव हे पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्ष वाढीसाठी खूप प्रयत्नशील आहेत. २५ वर्षापासून अंजनीकर हे भाजपा सोबत असून ते एकनिष्ठ राहिलेले आहेत म्हणून त्यांना भाजपा कडून त्यांना अनेक वेळा संघी देण्यात येत आहे. तसेच ते भाजपाचे नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड यांचे समर्थक असल्याने व एक निष्ठेतेचे फळ मिळत असल्याचे चर्चा होत आहे त्यांचेही मोठ्या प्रमाणात तालुक्यातून अभिनंदन होत आहे. अंजनीकर यांच्या निवडी बद्दल भाजपाचे जिल्हा अध्यक्ष संतुकराव हंबर्डे, आमदार जितेश अंतापुरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड, श्रावण पाटील भिलवंडे, बालाजीराव बच्चेवार, माणिकराव लोहगावे, संग्राम पाटील हायगले, भाजपा बिलोली शहर मंडळाचे अध्यक्ष इंद्रजीत तुडमे, भाजपा पश्चिम मंडळाचे अध्यक्ष शिवराज पा. बोधने, पूर्व मंडळाचे अध्यक्ष मारुती राहिरे, तसेच गावातील नागरिक यांच्यासह भाजपाचे अनेक नेते आणि कार्यकर्त्याकडून मोठ्या संख्येने अभिनंदन होत आहे.