राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस :महायुती सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज मंगळवारी २३ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता तहसिल कार्यालयासमोर डफडे आंदोलन करण्यात आले.यवतमाळ व वाशीम जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात अतीवृष्टी झाली सगळा शेतकरी हवालदील झालेला असतांना सरकार मात्र झोपेच सोंग घेत
झोपेतून जागे करण्यासाठी डफडे वाजवून आंदोलन करण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करा, शेतकऱ्यांना सरसकट अनुदान जाहिर करा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा या प्रमुख मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी उबाठा तालुकाध्यक्ष रवींद्र अरगडे, शहराध्यक्ष राहुल देशपांडे, पूनम पटेल, दीपक वानखडे सह कार्यकर्त्यांनी महायुती सरकारवर आपल्या भाषणातून टीकास्त्र सोडले.
या आंदोलनात उबाठा गटाचे दिग्रस तालुकाध्यक्ष रवींद्र अरगडे, शहराध्यक्ष राहुल देशपांडे, पूनम पटेल, स्वप्नील दुधे, राहुल धुळधुळे, प्रज्योत अरगडे, अक्रम पटेल, रवीकाळे, बाळू राठोड, गजानन हाडके, रिजवान नौरंगाबादे, दीपक वानखडे, अमर नरोडे, बालाजी ठाकरे, तेजस गावंडे, राजू सवणे, मारुती लोखंडे, दीपक फिसके, एजाज सह समस्त शिवसेना आजी-माजी सदस्य उपस्थित होते.





Social Plugin