Ticker

6/recent/ticker-posts

मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा - सामाजिक कार्यकर्ते जावेद अहेमद



 बिलोली प्रतिनिधी - आमेटवार राजेश 


  बिलोली ~ सध्या चालू असलेल्या ढगफुटीमुळे तसेच मागील काही दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे मांजरा नदी लेंडी नदी मन्या नदी या नदीपात्रातून होणारा पाण्याचा विसर्ग खूप मोठ्या प्रमाणात चालू होता. या पुराच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हाताला आलेले पीक भुईसपाट झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आले या महापुरातून नुकसान झालेल्या पिकांचे सरकार कडून भरपाई म्हणून आर्थिक मदत व्हावी याकरिता सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार बंधू अहमद जावेद यांनी मेलद्वारे शासनाला तात्काळ मदत करण्याची विनंती केली आहे.मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ टाकला असून नागरिकांना अस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे. अनेक भागात शेतीची मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली आहे.

यात नांदेड जिल्ह्यातील देगलूर,बिलोली,मुखेड तालुक्यात जोरदार अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक शेतकर्‍याचे पिकांचे नुकसान झाले आहेत. मराठवाड्यात अनेक ठिकाणी ढगफुटी झाल्यामुळे गावचे हजारो हेक्टर जमीन पुरातच बुडुन गेले. शेतकरी,गुरे,ढोरे व माणसाचा देखील यामध्ये जीव गमवावा लागला . शासनामार्फत देण्यात येणाऱ्या आर्थिक मदत ही तुटपुंजी स्वरूपाची आहे. यावर शेतकरी खूप नाराजी व्यक्त करत आहेत. तरी शासनास विनंती की सर्व शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करावे असे मेल द्वारे करण्यात आले असून शासन याची काय दखल घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहेत.