Ticker

6/recent/ticker-posts

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राजेश इंगोले

 



मालेगाव प्रतिनिधी जावेद भवानीवाले


मालेगाव ता 29 - 

मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी काँग्रेसचे राजेश नामदेवराव इंगोले यांची आज ता 29 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अविरोध निवड करण्यात आली

मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड संतोष दत्तात्रय पोफळे यांच्या विरुद्धचा अविश्वास दर्शक ठराव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांच्या ता 9 सप्टेंबर रोजी 13 विरुद्ध शून्य मतांनी मंजूर करण्यात आला होता 

तो अविश्वास प्रस्ताव ता २८ऑगस्ट रोजी जिल्हा निबंधक कार्यालयात दाखल करण्यात आला होता  

मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची सार्वत्रिक निवडणूक एप्रील २०२३ मध्ये पार पडली होती या निवडणुकीत आमदार अमित झनक व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दिलीप जाधव यांच्या नेतृत्वातील आघाडीने कृषी उत्पन्न बाजार समिती वर एक हाती वर्चस्व प्रस्थापित केले होते या मध्ये कॉग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सम समान सहा सदस्य, शिवसेना (उबाठा) गटाचे दोन,वंचित बहुजन आघाडीचा एक, शिवसेना शिंदे गटाचा एक उमेदवार निवडून आला होते तर विरोधी गटाचा एकमेव अपक्ष उमेदवार निवडून आला होता या निवडणुकीत भाजपाला आपले खातेही उघडता आले नव्हते हे विशेष १६ मे २०२३ रोजी झालेल्या सभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार) गटाचे गणेश उंडाळ यांची सभापती पदी वर्णी लागली होती मात्र दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्या नंतर ८ मे २०२५ रोजी गणेश उंडाळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्या नंतर ता १९ मे २०२५ रोजी झालेल्या सभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार) गटाचे ॲड संतोष दत्तात्रय पोफळे यांची सभापती पदी बिनविरोध निवड झाली होती त्यावेळी आमदार अमित झनक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दिलीपराव जाधव व संतोष पोफळे यांच्या चर्चे वेळी एक महिन्या नंतर पोफळे यांनी राजीनामा देण्याचे ठरले होते परंतु सभापती पदी निवड होऊन तिन महिन्याचा कालावधी झाल्यानंतरही ॲड पोफळे यांनी सभापती पदाचा राजीनामा न दिल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दहा संचालकांनी पोफळे यांच्या विरुद्धचा अविश्वास दर्शक ठराव जिल्हा निबंधका कडे दाखल केला होता अविश्वास दर्शक प्रस्तावावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उल्हासराव घुगे, गणेश उंडाळ, सुनीता चंदनशिव, अभिजीत गीद, गजानन शिंदे, संदीप घुगे, राजेश इंगोले, वैशाली आदमने, उद्धव गोडे, विजय अंभोरे, यांच्या स्वाक्षऱ्या होत्या 

आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या च्या संचालक मंडळाच्या बैठकीत सभापती पदासाठी राजेश इंगोले यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची अविरोध निवड करण्यात आली आजच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था महेश कच्छवे होते 

आजच्या बैठकीला संचालक गणेश उंडाळ गजानन शिंदे भूषण खाडे राजू गीद सुनिता चंदनशिव रवी भुतडा विजयकुमार भुतडा उल्हासराव घुगे संदीप घुगे  वैशाली आदमने राजकुमार इंगोले उपस्थित होते 

--