Ticker

6/recent/ticker-posts

झिंग चित्रपट लोकांच्या पसंतीस नक्कीच उतरेलः रोहित चव्हाण



पाटण(दिनकर वाईकर) 

        ग्रामीण ढंगातील, पारावर भरणारा तमाशा याचे हुबेहूब वर्णन 'झिंग' चित्रपटात साकारण्यात आलेले आहे. आपल्या लोककलेला नव्याने लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न युवकांनी केलेला आहे. झिंग हा ग्रामीण बाज असलेला शब्द आहे. एक वेड एक नशा आणि एक ध्यास मनी घेऊन या चित्रपटाची निर्मिती झालेली आहे. हा सिनेमा लोकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल अशी आशा कलाकार रोहित चव्हाण यांनी व्यक्त केली.

     झिंग मराठी चित्रपटाचे पोस्टर प्रमोशन करण्यासाठी चित्रपटाची सर्व टीम समाज सेवा संघ मोरे गल्ली पाटण याठिकाणी आली होती. 

     यावेळी गोरख नारकर मनसे अध्यक्ष, गणेश मोरे अध्यक्ष, सागर मोरे उपाध्यक्ष, चंद्रकांत मोरे मा. सरपंच, के.डी. चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, मयूर उबाळे, रोहित चव्हाण, सौरभ कुंभार, शुभम चौधरी, मोहन राऊत, अक्षय मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

       समाज सेवा संघ यांच्या गणरायाचे दर्शन घेऊन उपस्थित सर्वांनी झिंग चित्रपटाच्या पोस्टर चे अनावरण करण्यात आले. 

       रोहित चव्हाण, झिंग एक नशा, एक वेड आहे.  नवनवीन कलाकार आहेत. या युवकांनी जिद्द मनी बाळगली होती. तमाशा या विषयावर याचे चित्रपट झालेले आहे. गाणी सुंदर आहेत. आशिष पाटील नृत्यदिग्दर्शन केले आहे. युवकांनी ग्रामीण स्तरावर पारावर होणारा तमाशा हुबेहूब या चित्रपटात साकारले आहे. युवकांनी एक प्रकारचे वेड मनी बाळगून या चित्रपटाचा ध्यास घेतला होता.

       सौरभ कुंभार यांनी बोलताना, झिंग लोककला आधारित चित्रपट आहे. आठ गाणी या चित्रपटात आहे. चित्रपट १९ तारखेला प्रदर्शित होत आहे. आपल्या मातीतील सिनेमा आहे. 

       प्रास्ताविक मनोहर यादव यांनी करताना, पाटण तालुक्यात कला, संस्कृती, साहित्य याची परंपरा जोपासणारा आहे. आमच्या जवळच्या शहरातील दिग्गज अभिनेत्रा रोहित चव्हाण आहे. प्रतिकूल परिस्थितीत यांनी जिद्दीने स्वतः ला मराठी चित्रपट सूष्टीत आपली प्रतिमा उभी केली आहे. सौरभ कुंभार यांनी लोककलेला नव्याने आपल्या समोर मांडले आहे. 

     या चित्रपटास पाटणचा सुपुत्र मयूर उबाळे संगीत दिले आहे. तबला, संबळ, ढोलकी अतिशय सुरेख आणि मनाला भूरळ घालणारा साद मयुर ने दिलेली आहे. सर्व कलाकार पाटणच्या नागरिकांनी दिलेल्या प्रेमाने भारावून गेले.

    आभार के डी चव्हाण यांनी मानले.