शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे जाण्याच्या मार्गावर.
टेंभुर्णी प्रतिनिधी विष्णु मगर
गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
निसर्गाचा लहरीपणाने शेतकरी देशोधडीला लागला असून कधी अवकाळी, गारपीट, तर दुष्काळी परिस्थिती अशा या ना त्या परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. गेल्या आठ दिवसांपासून जाफराबाद तालुक्यात धो-धो पाऊस पडत आहे. संत धार पावसामुळे कपासी मका मिर्ची
सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले अति पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाचा तोंडाशी आलेला घास या परतीच्या पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झालेला दिसत आहे.आजच्या परिस्थितीमध्ये कपाशीची बोंडे अति पावसामुळे सड्डु लागल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
जाफराबाद परिसरात मागील अनेक दिवसांपासून धो पाऊस पडल्याने शेतात पाणी साचल्यामुळे सोयाबीनचे पीक खराब होऊ लागले. यामुळे निसर्ग जगु देईना व मायबाप सरकार शेतकऱ्याकडे बघेना अशी अवस्था झालेली दिसत आहे.
अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसानः पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करायल हावे पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा, जाफ्राबाद तालुक्यात १ ते ३ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. ऐन सणासुदीच्या तोंडावर हाताशी आलेली पिके पाण्याखाली गेली आहेत.
अनेक भागातील सोयाबीन, कांदा, कांदा रोपे, मका, कपाशी या सारख्या पिकांचे नुकसान होण्याची परीस्थिती ओढवली आहे. काही ठिकाणीतर नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे
पंचनामे, पीकविमा आणि इतर किचकट प्रक्रिया या शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी नंतर अडचणीच्या ठरतात. त्यामुळे पंचनामे वेळीच झाले, तरच नुकसान झालेली तीव्रता मांडली जाते. मागील अतिवृष्टीच्या काळात अनेक शेतकरी अद्यापही नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित आहेत. त्यातच हे पुन्हा दुहेरी संकट आल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. तहसीलदार डॉ. भगत मॅडम यांनी तीव्रता आणि उद्भवलेली परिस्थितीची पाहणी करून त्यावर कार्यवाही करावी. सरकारी पथकाने नुकसानीचा अहवाल पाठवत शासनाला तत्काळ वस्तुस्थिती निदर्शनास आणून द्यावी. यापूर्वीचा अनुभव कटू असल्याने शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीच्या तुलनेत भरपाई मिळाली नाही, यावर देखील लक्ष देऊन पंचनामे करताना काळजीपूर्वक करावे, अशी व्यथा यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त य केली. आम्ही देखील अतिवृष्टीच्या मदतीचे परिमाण लावताना शासनाला तीव्रता निदर्शनास आणून देणार आहोत. सर्वत्र नुकसान अधिक असल्याने सरसकट पंचनामे करून घेण्याची गरज आहे. या संकट काळात तातडीने मागील प्रलंबित पीकविमा रक्कम शेतकऱ्यांना प्राप्त झालेली नाही. त्यावरही कार्यवाही व्हावी. अशी अपेक्षा शेतकऱ्यांना वाटत आहे.





Social Plugin