जामनेर: तालुक्यातील मौजे सारगाव येथील सुपुत्र प्रमोद सुरेश वाघ यांनी नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस प्रबोधनीत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाचे खडतर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांची पहिली नियुक्ती मुंबई शहर येथे झाली असून, या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सारगावचे ते पहिलेच पीएसआय (PSI) ठरल्याने गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
याच पार्श्वभूमीवर, प्रमोद वाघ यांचे जामनेर शहरात आगमन झाले असता, त्यांच्या मित्रमंडळींच्या वतीने त्यांचे तालुकास्तरीय जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित मित्रांनी व ग्रामस्थांनी पुष्पगुच्छ आणि हार घालून त्यांना भावी वाटचालीस व नवीन नियुक्तीबद्दल हार्दिक शुभेच्छा दिल्या.
"सारगाव सारख्या ग्रामीण भागातून जिद्दीच्या जोरावर प्रमोदने हे यश संपादन केले आहे. त्याची मुंबई शहर येथे झालेली नियुक्ती आम्हा सर्व मित्रांसाठी आणि तालुक्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे," अशी भावना त्यांच्या मित्रमंडळींनी यावेळी व्यक्त केली.
या सोहळ्याला जामनेर परिसरातील त्यांचे मित्र, जितेंद्र माळी सरपंच टाकळी.श्री गणेश जाधव. महाराष्ट्र ग्रामीण न्युज. अर्जुन कमलाकर पाटील सर. अर्जुन श्रीराम पाटील उद्योजक. भाईदास चव्हाण पत्रकार. गौरव खोडपे सर. गौतम इंगळे. योगेश पाटील सर . दिनेश पाटील सर.व विजय पाटील प्रगतशील शेतकरी सामरोद. व असंख्य मित्र व स्नेही आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण तालुक्यातून प्रमोद वाघ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





Social Plugin